Marathi Yellow Pages

Marathi Yellow Pages

Member Login


Email ID
Password
Home  |  
Products  |  
About Us  |  
Membership  |  
Billboard  |  
Home » About Us

  
आमच्या विषयी

मराठी यलोपेजेस डाँट काँमTM हे एक मराठी व्यापा-यांकरीता वेबपोर्टल आहे. जागतिक पातळीवर मराठी व्यापा-यांना एकत्र आणणे ही काळाची गरज आहे. त्याकरीता डाँट काँम डिझायनर्स या कंपनीने हे वेब पोर्टल निर्माण करण्याचे आव्हान स्विकारले आहे.

वेब पोर्टलचा मुख्य हेतू मराठी व्यापा-यांना जागतिक व्यासपीठावर एकत्र करून व्यापारी जाळे विणणे आहे. एकाच छत्राखाली संपूर्ण जगातील मराठी उद्योजक एकत्र असण्याची ही पहिलीच वेबसाईट आहे. या साईटच्या माध्यमातून एक मराठी व्यक्ती दुस-या मराठी व्यक्तीला बिझनेस देऊन आपल्याच मराठी बांधवांची आर्थिक ताकद वाढवू शकते. मराठी व्यापा-याने मराठी व्यापा-याशी व्यापार केल्याने मराठी समाजाची प्रगती यातून निश्चितच साधू शकते हाच या पोर्टलचा मुख्य हेतू आहे. आज काँर्पोरेट क्षेत्रातील नामवंत कंपन्यांमध्ये मोठया हुद्यावरील मराठी व्यक्तींना, तसेच आपल्यालासुद्धा मनातून मराठी माणसाला बिझनेस देण्याची इच्छा असूनही मराठी व्यापा-यांविषयी माहिती उपलब्ध नसल्यामुळे व्यापारी उलाढाल होऊ शकत नाही. या वेबसाईटवर विविध क्षेत्रातील मराठी व्यापारी एकत्र आल्यामुळे ही गैरसोय निश्चितच टळेल. या वेबसाईटचा उद्देश मराठी समाजाचा उत्कर्ष साधणे व एकंदरीत सर्वच क्षेत्रात कमी होत असलेला मराठी टक्का वाढविणे हाच आहे.

सदर वेबसाईट लोकप्रिय होण्यासाठी अनेक माध्यमांचा वापर करण्यात येणार आहे. जसे की, वर्तमानपत्रामध्ये जाहिरात, मोक्याच्या ठिकाणी होर्डिंग्ज, बस पॅनेल जाहिरात, रेडिओ जाहिरात, इंटरनेट माध्यम सर्च इंजिन Google - Yahoo मार्केटिंग, Email मार्केटिंग,  टेलिकाँलिंग, SMS मार्केटिंग, कुरिअर मार्फत माहिती पत्रके वाटप इत्यादि माध्यमे वापरण्यात येणार आहेत. मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही हा समज खोटा ठरवत लाखो मराठी व्यापारी या स्तुत्य उपक्रमात सभासदत्व घेतील यात शंकाच नाही. सदर वेबसंकल्पना आपल्या परिचयातील मराठी व्यापा-यांना कळवून मराठी व्यापारास हातभार लावावा, ही नम्र विनंती. जयहिंद! जयमहाराष्ट्र!

मराठी तितुका मिळवावा । मराठी व्यापार वाढवावा

मोलाचा सल्ला
यशोगाथा
Contact Us  :  Disclaimer  :  Copyright © 2009